Site icon लोकवार्ता

लावणीच्या ठेक्यावर झळकणारी प्रतिभा : तेजल गिरीश गुरव

बातमीत काय वाचाल?

  • सन 2023 व 2025 मध्ये इराक (एर्बिल), तुर्की व रशिया येथे परफॉर्मिंग आर्ट्स सादर करण्यासाठी त्यांची निवड झाली, ज्यामुळे त्यांचा कलात्मक प्रवास आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारला.
  • ती एक गुणी व्यावसायिक नर्तकी व नृत्यदिग्दर्शिका* असून, आपल्या कलेच्या जोरावर तिने देश-विदेशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
  • त्यांनी भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारात औपचारिक शिक्षण पूर्ण केले असून, भारतीय शास्त्रीय नृत्याबद्दल तिचे विशेष समर्पण आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत लावणी हा केवळ नृत्यप्रकार नसून एक समृद्ध भावविश्व आहे. या परंपरेला नव्या पिढीतील कलाकारांनी नवी ऊर्जा दिली असून, त्यामधील एक उल्लेखनीय नाव म्हणजे तेजल गिरीश गुरव होय. ती एक गुणी व्यावसायिक नर्तकी व नृत्यदिग्दर्शिका* असून, आपल्या कलेच्या जोरावर तिने देश-विदेशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

IBC – लोकवार्ता प्रस्तुत “महाराष्ट्राची लावणी क्वीन” या प्रतिष्ठित स्पर्धेत तिने सहभाग नोंदवून आपल्या कलेचा ठसा उमटवला आहे. ही स्पर्धा केवळ नृत्यापुरती मर्यादित नसून कलाकाराच्या व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास व सादरीकरणाची खरी परीक्षा घेणारी आहे. अशा मंचावर तिची उपस्थिती ही तिच्या प्रतिभेची साक्ष आहे.

समृद्ध कलात्मक प्रवास

तेजल गुरव हिची कला क्षेत्रातील पार्श्वभूमी अत्यंत भक्कम आहे. त्यांनी भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारात औपचारिक शिक्षण पूर्ण केले असून, भारतीय शास्त्रीय नृत्याबद्दल तिचे विशेष समर्पण आहे. त्याचबरोबर अस्मिता चित्र प्रॉडक्शन तर्फे तिने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे, ज्यामुळे तिच्या सादरीकरणात अभिनयाची छटा दिसून येते.

विविध नृत्यशैलींमध्ये प्रावीण्य

तिची खासियत म्हणजे तिची बहुआयामी नृत्यकला. तेजल भरतनाट्यम, लावणी आणि वेस्टर्न नृत्यशैली अशा शास्त्रीय आणि लोककलेच्या नृत्यप्रकारांमध्ये पारंगत आहे. या विविधतेमुळे तिचे सादरीकरण नेहमीच आकर्षक व प्रभावी ठरते.

राष्ट्रीय ते आंतरराष्ट्रीय झेप

तेजल गुरव यांच्या कलेने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशातही उल्लेखनीय झेप घेतली आहे:

सन 2022 व 2024 मध्ये दिल्ली येथे आयोजित प्रतिष्ठित चित्ररथ सोहळ्यात त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले.
सन 2023 व 2025 मध्ये इराक (एर्बिल), तुर्की व रशिया येथे परफॉर्मिंग आर्ट्स सादर करण्यासाठी त्यांची निवड झाली, ज्यामुळे त्यांचा कलात्मक प्रवास आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तारला.
सन 2022 ते 2024 दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या जी20 कार्यक्रमात त्यांनी सहाय्यक नृत्यदिग्दर्शिका म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

याचबरोबर ती सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी मेघा घाडगे हिची सहाय्यक नृत्यदिग्दर्शिका म्हणून कार्यरत असून, तिच्या मार्गदर्शनाखाली तेजलने आपली कला अधिक परिष्कृत केली आहे.

शिक्षण आणि कला यांचा सुंदर संगम

कलेसोबत शिक्षणालाही तेवढेच महत्त्व देत तेजलने मराठी विषयात एम.ए. पूर्ण केले आहे. त्यामुळे तिच्या सादरीकरणात सांस्कृतिक जाण व बौद्धिक समृद्धी यांचा सुंदर मिलाफ दिसून येतो.

तेजल गिरीश गुरव ही केवळ एक नर्तकी नसून ती महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाची जिवंत प्रतिनिधी आहे. तिची जिद्द, परिश्रम व कलेबद्दलची निष्ठा यामुळे ती निश्चितच भविष्यात उच्च शिखर गाठेल असा विश्वास वाटतो.

“महाराष्ट्राची लावणी क्वीन” या मंचावरून त्यांच्या यशस्वी प्रवासाला नवी दिशा लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा!

Exit mobile version